औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसी भागात स्वामी विवेकानंद अकॅडमी माध्यमिक शाळा आहे. मात्र अचानक कोणतीही सूचना न देता यावर्षी प्रवेश बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. यामुळे पालक संतप्त झाले आहेत. पालकांकडून कोणतेही अर्ज न मागवता परस्पर घरपोच दाखले दाखले पाठवले जात आहेत. याबाबत शनिवारी (दि.१४) युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत चौकशी केली असता कोणीही आढळून आले नाही, तसेच मुख्याध्यापकांसहित सर्वांचे दूरध्वनी क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेला पालकांसहित टाळे ठोकले.
कोरोना काळामध्ये अचानकपणे स्वामी विवेकानंद अकॅडमी शाळेने मराठी माध्यमाच्या तब्बल ३४८ विद्यार्थ्यांना पोस्टाने टीसी पाठवून शाळा बंद करण्यात आली आहे, तसेच शाळेची उर्वरित फीस आपण त्वरित भरावी अशा आशयाचे पत्र पाठवले. हि बाब युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी आज स्वामी विवेकानंद अकॅडमी येथे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ते गेले. मात्र तेथे कुणीही आढळले नाही. तसेच त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संस्थाचालकांसाहित सर्वांचे फोन बंद आढळून आले. या वेळी संतप्त युवासैनिकांनी पालकांना सोबत घेऊन शाळेला टाळे ठोकले आहे.
यावेळी याठिकाणी पोलीस आले असता युवासेनेची आणि पोलिसांची शाब्दिक चकमक झाली. विद्यार्थ्यांसहित शाळेतील तब्बल २५ शिक्षकांना देखील कुठलीही माहिती न देता काढून टाकले आहे. शिक्षक अधिकारी यांनी शाळा बंद करू नये अशे स्पष्ट निर्देश दिले तरी सुद्धा शिक्षण संस्था मनमानी कारभार चालवत आहे. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून युवासेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे यांच्या समवेत जिल्हा समनव्यक संदीप लिंगायत, उपजिल्हाधिकारी गणेश तेलोरे, यांच्यासाहित पालक, विद्यार्थी, शिक्षक व युवासैनिकांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने पवार,ठाकरे चव्हाणांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन
- पैठणच्या संत एकनाथ वाचनालयातील लसीकरण केंद्रावर गोंधळ !
- दिलासादायक ! पुण्यात आज तब्बल ३ हजार रुग्ण कोरोनामुक्त
- हेवेदावे विसरून संविधानाने दिलेले हक्क व आरक्षण टिकवण्याचा मागासवर्गीय संघटनांचा निर्धार!
- हिश्श्यात बैल न मिळाल्याचा राग धरत, पोटच्या मुलानेच केली पित्याची हत्या


