हिंगोली : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालाने मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. त्यांनतर आता 102 वी घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
यानंतर राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्रोश पाहायला मिळत आहे. हिंगोलीत आज मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, शरद पवार यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. त्यांनतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असून यापुढे आणखी आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही भिसे पाटील यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिलासादायक ! पुण्यात आज तब्बल ३ हजार रुग्ण कोरोनामुक्त
- हेवेदावे विसरून संविधानाने दिलेले हक्क व आरक्षण टिकवण्याचा मागासवर्गीय संघटनांचा निर्धार!
- हिश्श्यात बैल न मिळाल्याचा राग धरत, पोटच्या मुलानेच केली पित्याची हत्या
- मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर फुलंब्रीत मोफत धान्य वाटपास सुरुवात!
- ‘चुका काढण्याची किंवा टिका करण्याची ही वेळ नाही,आलेल्या संकटाशी सर्वांनी मिळून लढूयात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

