औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील मुर्शीदाबादवाडी येथे किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून वडीलांची हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) गणोरी फाटा कमानी जवळ उघडकीस आली आहे. या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने व फुलंब्री पोलिसांनी अवघ्या नऊ तासात उलगडा करून बापाची खून करणा-या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. परसराम अप्पा पवार (६५) असे घटनेतील मयत वडीलांचे नाव आहे. तर रोहिदास परसराम पवार (३५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
मुर्शीदाबादवाडी येथील परसराम आप्पा पवार यांना दोन मुले असून दोघेही सहा महिन्यांपूर्वी कुटूंबातून विभक्त झाले आहे. गुरुवारी दि.१३ परसराम पवार यांच्या दोन्ही मुलात आपसात शेती बैलाच्या कारणावरून किरकोळ भांडणे झाली. दरम्यान गुरुवारी परसराम पवार सकाळी फुलंब्री येथे जाऊन अक्षय तृतीयेच्या सणासाठी साहित्य खरेदी करून दुपारी वाजेच्या दरम्यान गणोरी फाट्यावर आले. एका ओळखीच्या व्यक्तीजवळ केळी अन करा दिला दुपारी ते गणोरी फाटा परिसरातच होते.
सायंकाळी ते घरी आले नसल्याने त्यांचा मोठा मुलगा रोहिदास पवार अकरा वाजेच्या सुमारास गणोरी फाटा येथे त्यांचा शोध घेण्यासाठी आला, तेव्हा ते गणोरी फाटा येथे आढळून आले. त्यांना मुलाने घरी चलण्याची विनवणी केली. परंतु त्यांनी घरी येण्यास नकार दिला. दरम्यान, त्यांच्यात वाद झाला व मुलगा रोहिदास याने यावेळी रागाच्या भरात वडील परसराम यांच्या डोक्यात दगड मारल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून मुलाने तेथून पळ काढत घर गाठले.
दरम्यान शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी जाणा-या नागरिकांना गणोरी फाट्यावरील कमानीजवळ पवार यांचा मृतदेह आढळून आल्याने घटनेची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, दामोदर वाघमारे, रघुवीर मु-हाडे हे पोलीस कर्मचा-यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास फुलंब्री पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या नऊ तासात लावला असून बापाच्या डोक्यात दगड घालून ठार मारणा-या मुलास बेड्या ठोकल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शहरासाठी २१८ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी उपाय योजना करा, खंडपीठाचे निर्देश
- कोरोना नंतर म्युकरमायकोसीस आजार; प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याचा दृष्टीकोन हवा- आ. निलंगेकर
- मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
- चक्रीवादळाचे रौद्ररूप : केरळातील अनेक घरे जमीनदोस्त, कोकणात समुद्र खवळला
- ‘म्युकरमायकोसिस’चा लातुरात शिरकाव; ५ रुग्ण आढळले


