Share

हेवेदावे विसरून संविधानाने दिलेले हक्क व आरक्षण टिकवण्याचा मागासवर्गीय संघटनांचा निर्धार! 

Published On: 

औरंगाबाद : शासनाने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात सर्व मागासवर्गीय संघटनांची आरक्षण हक्क कृती समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून राज्यभर २० मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आपसातले हेवेदावे विसरून मागासवर्गीयांचे संविधानाने दिलेले हक्क, सोयीसुविधा व आरक्षण टिकविण्याचा निर्धार करण्यात आला.

राज्य शासनाने ७ मेरोजी मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण रद्द केले. याविरोधात राज्यातील प्रमुख मागासवर्गीय संघटनांच्या ९, १० आणि ११ मे रोजी बैठका घेतल्या. त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय संघटनांची एकत्रित ऑनलाइन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मजदूर युनियन, आयबीसेफ, कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ, बाणाई यासह इतर मागासवर्गीयांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, तसेच माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हरिभाऊ राठोड याची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत आरक्षणवादी, संविधानवादी, मागासवर्गीय व बहुजन संघटना तसेच समाज बांधवांनी आता एकत्रित लढले पाहिजे, याबाबत एकमत झाले. त्याचाच भाग म्हणून आरक्षण हक्क कृती समितीतर्फे २० मे रोजी राज्यभर सर्व मागासवर्गीय संघटना, संस्थेच्या वतीने तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. नियम पाळून सर्व संघटना स्थानिक जिल्हाधिकारी, तहसिलदारांना निवेदन देणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मागासवर्गीय मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्या निवासस्थानीही आंदोलन करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!