Share

‘कोल्हापूर, सांगलीकडे जाणे टाळा’ ; पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक वळवली

Published On: 

पुणे : मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजला असून महापुराचा विळखा क्षणाक्षणाला घट्ट होत आहे. पंचगंगा, वारणा, कृष्णा यासह सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावात, घरात पाणी घुसले आहे. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात येत आहे. पाणी वाढल्याने पुणे- बेंगळुरू महामार्गासह जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाल्याने शंभरावर गावांचा संपर्क तुटला आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये पाणी वाढत असल्याने महामार्गावरील वाहतूक खेडशिवपूर आणि शिरवळ पंढरपूर फाटा येतून वळवण्यात आलीय. लहान वाहनांना खेडशिवपूर टोल नाक्यावरून पुन्हा मागे जाण्यास सांगण्यात येत आहे.शिरवळजवळ मोठ्या गाड्याना थांबवण्यात आले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. खबरदारी म्हणून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना थांबण्याची विनंती पोलीस यंत्रणा करत आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठार-रेठरे भागात मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. महामार्गावरची वाहतूक आता धीम्या गतीने सुरु आहे. कोणत्याही क्षणी महामार्गावरची वाहतूक बंद केली जावू शकते. याबाबत महामार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण रणदिवे म्हणाले कि, ‘कोल्हापूर येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने कोल्हापूर आणि सांगलीकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यावरूनच कोल्हापूर आणि सांगलीकडे जाणारी वाहने मागे वळविण्यात येत आहेत. सदर परिस्थिती पाहता नागरीकांनीही कोल्हापूर, सांगलीकडे जाणे टाळावे.’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!