Share

दहावीनंतर आता प्रतिक्षा बारावीच्या निकालाची, औरंगाबाद विभागातील ४२ टक्के काम पूर्ण!

Published On: 

औरंगाबाद : दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांना व पालकांना बारावी निकालाची उत्सुकता लागली आहे. दहावी अकरावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे हा निकाल तयार केला जात असून त्याचे पंचाहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. औरंगाबाद विभागाअंतर्गत येणार्‍या जिल्ह्यातील ४२ टक्केच कनिष्ठ महाविद्यालयांनी औरंगाबाद विभागीय मंडळाकडे निकाल पाठवला आहे.

शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार १६ जुलै पासून कनिष्ठ महाविद्यालयाने निकालाचे काम सुरू केले आहे या अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी मंडळाने जुलैपर्यंत मुदत दिली आहे. यात औरंगाबाद विभागातील जालना, परभणी, बीड, औरंगाबाद आणि हिंगोली अशा पाच जिल्ह्यातून एकूण १ लाख ५३ हजार ६७० परीक्षार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. दहा दिवसात एक लाख आठ हजार ८१५ विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांकडून भरण्यात आली आहे.

दरम्यान, गुरूवारी (दि .२२) दुपारपर्यंत फक्त ४२ टक्के कनिष्ठ महाविद्यालयांनी मंडळाकडे आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल पाठवला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांकडून बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल घेत आहोत. कनिष्ठ महाविद्यालयांनी लवकर निकाल पाठवावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालये देखील आम्हाला मदत करत आहे. आजपर्यंत ४२ टक्के कनिष्ठ महाविद्यालयांनी आमच्याकडे निकाल पाठवल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!