मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राला कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांनतर आज झालेल्या सुनावणीत राज कुंद्रा आणि रायन थॉर्पे यांना आणखी पुढील 7 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान आता काही वेळापूर्वी मुंबई गुन्हे शाखेची पथक राज कुंद्रा संदर्भात त्याच्या जुहू बंगल्या ‘किनारा’ वर पोहोचली आहे. शिल्पा शेट्टीही या बंगल्यात राहते. राज कुंद्राच्या न्युफ्लिक्स नावाच्या नवीन अॅप (प्लॅन बी) साठी बनविण्यात येणाऱ्या कराराची कागदपत्रे, काही गहाळ सीडीज आणि १९ अडल्ट व्हिडिओंशी संबंधित गहाळ सर्व्हरही पोलिस शोधत आहेत.
राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आयपीसी कलमांसोबतच आयटी अॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67A हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांदा गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आकारला जातो.
त्याचबरोबर मुंबई गुन्हे शाखेला राज कुंद्राबाबत आता आंतरराष्ट्रीय कनेक्शन चर्चेत येत आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, व्हॉट्सअॅप चॅटवर त्यांना माहिती मिळाली आहे की, राज कुंद्रा १२१ लाख व्हिडिओ १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर विकले असल्याचे बोलत आहेत. मुंबई पोलिस म्हणाले की, ही आंतरराष्ट्रीय स्तराची बाब असल्याचे दिसते.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’
- ‘पूर परिस्थितीतही मुख्यमंत्री मातोश्रीवर आहेत, आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो’
- ‘वर्षभर घरी बसून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची व्याख्या बदललीच आहे की..’ भाजपचा टोला
- ‘काँग्रेसने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले’, काँग्रेसचा हल्लाबोल


