🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असतो. तसेच डेव्हिड वॉर्नर बॉलीवूडचा देखील चाहता आहे. डेव्हिड वॉर्नर नेहमीच बॉलीवूड कलाकारांसारखे लुक करून इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतो. त्याच्या अंतरंगी व्हिडिओंसह तो नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करतांना दिसून आला आहे. यावेळी देखील अशाच एका कारणाने वॉर्नर चर्चेत आला आहे.
मायदेशी परतल्यानंतर वॉर्नरचा मुड चांगलाच फ्रेश झालेला आहे. त्यामुळेच त्यानं क्रिकेट फॅन्सची मागणी पूर्ण करत एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. बॉलिवूडची स्टार आलिया भट्टसोबत डान्स केला आहे. हुक अप गाण्यावर वॉर्नर डान्स करताना दिसत आहे. डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने स्वत: ला रिफेस अॅपद्वारे टायगरच्या जागी आपला चेहरा बनवला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसोबत ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ च्या ‘हुक अप सॉन्ग’ वर वॉर्नर आलियासोबत नाचताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CPscdBgFY-C/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने तत्काळ स्पर्धा स्थगित केली. या स्पर्धेत गुणतालीकेत सर्वात खाली सनरायझर्स हैदराबादचा संघ होता. हैदराबादच्या संघाने स्पर्धेत ७ सामने खेळताना केवळ एका सामन्यात विजय मिळवत सहा सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले होते. यादरम्यान हैदराबाद संघ व्यवस्थापनाने खराब कामगीरीमुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली होती. लवकरच आयपीएलचे उर्वरित सामने दुबईमध्ये होणार आहेत. मात्र यावेळी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल सामने खेळणार नसल्याचे समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही’
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
