🕒 1 min read
ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ या मैदानात खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. कालच्या 5 बाद 274 धावसंख्येनंतर आज सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने धावफलकावर आरामात त्रिशतक झळकावलं. काल खेळ संपला तेव्हा नाबाद असलेल्या कॅमरॉन ग्रीन आणि कर्णधार टीम पेन या दोघांनी 98 धावांची भागिदारी रचत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली.
परंतु आजच्या दिवसातील सुरुवातीच्या 12 षटकानंतर भारतीय गोलंदाजांनी गियर बदलला. 99 षटकात 5 बाद 310 वर असलेल्या ऑस्ट्रेलियाची 102 षटकात 8 बाद 315 अशी अवस्था केली. त्यानंतर नेथन लायन आणि मिचेल स्टार्कने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली, मात्र वॉशिंग्टन सुंदरने लायनला माघारी धाडले. त्यानंतर 369 धावांवर भारताला दहावं यश मिळालं. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 108 धावांचं योगदान दिलं. तर भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेता आली.
बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला काल (15 जानेवारी) पासून सुरुवात झाली. ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ या मैदानात हा सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने काल टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच भारतीय टीमने चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 369 धावांवर संपुष्टात आणला.
महत्वाच्या बातम्या
- विषय पंपावर : भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोल २ रुपये स्वस्त !
- MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारांसाठी आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय
- मोठी बातमी : टीम इंडियाचा ‘हा’ गोलंदाज हॉस्पिटलमध्ये
- औरंगाबादेत पहिल्या दिवशी तेराशे कोरोना योद्ध्यांना लस
- आज सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लसीकरणाचे उद्घाटन

