मुंबई : देशासह राज्यात आजपासून (शनिवार) लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिली जाणार आहे. राज्यात पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना काल सायंकाळपर्यत मेसेज पाठविण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे आत सर्वांची नजर ही लसीकरण मोहीमेवर असणार आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी २८५ केंद्रांवर करोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईत कूपर रुग्णालयात शनिवारी सकाळी साडे दहा वाजता होईल. त्यानंतर राज्यातील २५८ केंद्रांवर लसीकरणास सुरुवात होईल. राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील वांद्रे-कुर्ला करोना आरोग्य केंद्रात करणार आहेत.
दररोज सकाळी नऊ ते पाच या वेळेत लसीकरण केले जाईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील तीन कोटी करोना योद्धय़ांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पन्नाशीवरील व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येईल. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- विषय पंपावर : भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोल २ रुपये स्वस्त !
- MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारांसाठी आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय
- मोठी बातमी : टीम इंडियाचा ‘हा’ गोलंदाज हॉस्पिटलमध्ये
- औरंगाबादेत पहिल्या दिवशी तेराशे कोरोना योद्ध्यांना लस
- पंकजा मुंडेकडून धनजंय महाडिकांचा ‘खासदार’ म्हणून उल्लेख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

