ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला गुरूवार पासून सुरूवात झाली आहे. ऍडलेडच्या मैदानात होणारी ही टेस्ट मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येत आहे. पहिल्या डावात भारताच्या फलंदाजांना फारशी उठावदार कामगिरी करता आली नव्हती. भारताने पहिल्या डावात 244 धावा केल्या.
आजचा दिवस म्हणजेच दुसऱ्या दिवस हा गोलंदाजांच्या नावावर असलेला पाहायला मिळाला. आजच्या दिवसात तब्बल एकूण 15 विकेट पडल्या. भारतीय गोलंदाजीने पहिल्या डावात उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 191 धावांमध्ये माघारी पाठवण्यात यश आलं.
तर, भारताच्या दुसऱ्या डावाचा खेळ आजच्या दिवशी सुरु झाला असून दिवस संपताना भारताला 1 गडी गमावून 9 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे सुरूवातीलाच भारताला एक गडी गमवावा लागला असून पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अपयशी झाला आहे. त्याला अवघ्या ४ धावांमध्येच माघारी परतावं लागलं आहे. आजच्या दिवसाअखेर भारताकडे आता 62 धावांची आघाडी (लीड) आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताकडून उमेश यादवने 3, बुमराहने 2, अश्विनने 4 विकेट घेतल्या.
दुसरीकडं, आज भारताच्या क्षेत्ररक्षणात चुका झाल्याचं दिसून आलं. पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, जसप्रीत बुमराह यांनी झेल सोडल्यामुळे कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आलं. पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चांगली खेळी करण्यात अपयशी ठरल्याने त्याच्यावर सोशल मीडियातून क्रिकेट चाहते नाराजी व्यक्त करत असून अनेक मिम्स देखील व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पडळकरांच्या बोलवत्या धन्याने त्यांना आवरावे; मुश्रीफांनी दिला इशारा
- पंतप्रधानांच्या ‘हर घर वीज’ उद्दिष्टाला हरताळ; कोटेशन भरूनही राज्यात ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत !
- नव्या कृषि कायद्यांचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी
- …म्हणून राहुल गांधींची बौद्धिक पातळी हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनू शकतो काय? भाजप नेत्याने उडवली खिल्ली
- करमाळ्यात दहशत माजवणाऱ्या बिबट्याच्या खात्म्यासाठी खा. नाईक-निबाळकरांनी मागवलं हेलिकॉप्टर


