🕒 1 min read
मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.
या सर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. संभाजीनगर असा CMOवर होणारा उल्लेख काही नवा नाही. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. त्यात नवीन काय केलं मी? जे वर्षानुवर्षे बोलत आणि करत आलोय तेच मी करतोय. औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात जो सेक्युलर हा शब्द आहे त्यात औरंगजेब बसत नाही,’ असं सडेतोड प्रत्युत्तर त्यांनी काँग्रेसला दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी , मात्र शरद पवारांनी आपलंसं केलं
- शिवसेनेच्या खासदाराने केला छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख
- बॉम्बेचं मुंबई झालं मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही ? उदयनराजे कडाडले
- शेतकऱ्यांनी दिला ‘जिंकू किंवा मरू’चा नारा; सरकार-शेतकरी यांच्यातील आठवी फेरी देखील निष्फळ
- कंगनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप धुडकावले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

