Share

‘औरंगाबादकरांची स्वयंशिस्तच ‘मास्क मुक्त’ आयुष्याचा रस्ता बनवेल’, मनपा आयुक्तांचा ‘महाराष्ट्र देशा’ला विश्वास

Published On: 

औरंगाबाद : ‘सध्या माझ्या चेहऱ्यावर जे स्मितहास्य तुम्हाला दिसत आहे. त्यातच सर्वकाही आले. आपल्या औरंगाबाद शहरातील सद्यपरिस्थिती संतोषजनक आहे. रुग्णसंख्या घटत आहे. कोविड केअर सेंटर्स बंद पडत आहेत. बेड्सची कमतरता नाही. जर भविष्यात आपल्याला मास्कमुक्त आयुष्य जगायचे असेल तर सध्या सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटाइजर या त्रिसूत्रींना कायम ठेवा ‘. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी खास बातचीत केली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शहरात आणि जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आपण दुसऱ्या लाटेविरुद्ध लढाई जिंकलो आहोत काय? यावर पांडेय म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना विषयी आपल्याला कुठलीही माहिती नव्हती. त्यानंतर हळूहळू आपण ट्रेन होत गेलो. यंदा आपल्याकडे लसरुपी अस्त्र होते. आपण तेही वापरले. विकेंड लॉकडाऊन, शासनाचे कडक निर्बंध, ब्रेक द चेन, औरंगाबादकरांची स्वयंशिस्त यामुळे दुसरी लाट थोपवून लावण्यात आपण यशस्वी झालोय. पूर्णपणे जिंकलोय असे नाही म्हणणार मात्र यशस्वी झालोय इतके जरुर सांगेल.

यापुढे आपण काय करणार आहोत यावर त्यांनी उत्तर दिले, आजपर्यंत अशी परिस्थिती उद्भवलेली नाही कि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन रुग्ण उभा आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेविरुद्धही आपण यशस्वी होऊच. आपली वैशिष्ट्ये, वेगळेपण काय होते? यावर ते म्हणाले, सुरुवातीपासून कोरोनाला समजून घेऊन औरंगाबाद मनपाने त्या याविरोधात लढा उभारला. गरज आणि प्राथमिकता लक्षात घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोविड काळात फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधत त्यांना दिलासा देणारी औरंगाबाद पालिका एकमेव होती.

सुरुवातीपासून कोविड रुग्णांना जेवण पुरवण्यात आपण थोडे कमी पडलो. सुरुवातीला कंत्राटदार नेमून काम देण्यात आले. तो प्रयोग काही कारणास्तव फसला. त्यानंतर आपण स्वत:ते किचन सुरु केले मात्र एकसोबत पाच हजार रुग्णांना जेवण देण्यात कमतरता राहिलीच. कारण औरंगाबाद मनपा नालेसफाई, नागरी समस्या यात ट्रेन होती जेवण बनवण्यात नव्हे.

प्रशासन प्रमुखांमध्ये समन्वयाचा कुठलाही अभाव नसल्याचे त्यांनी सांगितले. काही लोकं असे असतात कि जे रिकामे बसलेले असतात. म्हणतात ना खाली दिमाग शैतान का घर होता है. जेव्हा एखादी व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर काम करत असते तेव्हा त्या पदाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात. त्या प्रामाणिकपणे पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य असते. जिल्हाधिकारी चव्हाण सर, पोलीस आयुक्त गुप्ता सर यांच्याबाबतही हिच गोष्ट लागू होते. त्यामुळे समन्वयाचा अभाव असे काहीच नव्हते, कधीच नसेल.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!