नवी दिल्ली- तारांकित हॉटेलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याची कृती बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं आहे. देशभरातील कोणत्याही हॉटेलमध्ये अशा प्रकारची मोहीम सुरु असल्यास ती त्वरित थांबवावी अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर काही तारांकित आणि बड्या हॉटेलनी विशेष लसीकरण पॅकेज सुरु केली असून त्यात आरामदायी वास्तव्याबरोबरच मोफत लस दिली जात आहे. अशी लसीकरण मोहीम बेकायदा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अप्पर सचिव डॉ. मनोहर आगनानी यांनी लेखी आदेशाद्वारे स्पष्ट केलं आहे .
दरम्यान, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या नावनोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या कोविन प्लॅटफॉर्मच्या कामगिरीबद्दल केल्या जात असलेल्या कथित तक्रारींचे दावे सरकारनं फेटाळून लावले आहेत. कोणत्याही सायबर हल्ल्यानं बाधित होऊ शकणार नाही अशा प्रकारे कोविन प्लॅटफॉर्मची रचना करण्यात आली आहे, असं कोविड 19 चा सामना करण्यासाठी नेमेलेल्या तंत्रज्ञान आणि विदा व्यवस्थापन गटाचे अध्यक्ष डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने केला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- कोरोना नियमांची पायमल्ली करत आमदार महेश लांडगेंचा डान्स, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
- मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल – सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

