औरंगाबाद : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मराठा समाज आक्रमक झाला असून भाजप खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारला ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी ५ प्रमुख मागण्या केल्या असून त्या मान्य न झाल्यास शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून आंदोलनाची सुरुवात करू, असा इशारा दिला आहे.
मागील काही दिवसांमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजेंनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून ते पुढे कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अशातच संभाजीराजे यांच्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. राज्य सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, असा आरोप संभाजीराजेंनी केलाय.
या प्रकरणी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘आम्ही संभाजीराजेंच्या सोबत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. राज्य सरकारवर संभाजीराजेंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. राज्य सरकार त्यांच्यावर पाळत ठेवत असेल तर हा त्यांचा अवमान आहे,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
काय आहे संभाजीराजेंचं ट्विट ?
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे.
माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
‘सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?’ असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला असून आता राजकीय क्षेत्रात नव्या वादास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही’
- पुणेकरांना दिलासा : मद्यविक्रीसह इतर दुकानांना ‘या’ वेळेत परवानगी !
- ‘पळ काढू नका, मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही’; चंद्रकांतदादांची गर्जना
- औरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या नवीन अंशदायी पेन्शन वाटपात मोठा घोळ!
- पुणेकरांना दिलासा : मद्यविक्रीसह इतर दुकानांना ‘या’ वेळेत परवानगी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

