Share

ग्रामस्थांना आरोग्याच्या काळजीबाबत माहिती द्या – डॉ. शहेनाज अन्सारी

Published On: 

औरंगाबाद : येणाऱ्या पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी व उपाययोजना याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्याचे आवाहन जातेगाव येथील अशा स्वयंसेविकांना करण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथे नुकताच हा कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र, जातेगावच्या वतीने आशा स्वयंसेविकांना मार्गदर्शन करण्यात आले.

पावसाळ्यात अनेक साथीचे आजार उदभवतात. या दृष्टीने ग्रामस्थांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच परिसर स्वच्छतेबाबत कोणत्या प्रकारे जनजागृती करावी याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जातेगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. शहेनाज अन्सारी यांनी शिबिराला मुख्य मार्गदर्शन केले.

यासोबतच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संजय कुलकर्णी, आरोग्य सेवक देशपांडे, बहुरे, गटप्रवर्तक श्रीमती तरटे यांनी आशा स्वयंसेविकांना आवश्यक सूचना केल्या. यात किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप या आजारांवर जलद सर्वेक्षण, जनजागृती व घेण्याची काळजी याचे तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व आशा स्वयंसेविका व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदरील कार्यशाळा कोरोना नियम पाळून घेण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!