Share

संचारबंदीत गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी

Published On: 

औरंगाबाद: राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मागील‌ दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. याच लाटेला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंध लागू केले होते. परंतु काही लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार त्यांच्याच सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवुन या नियमांचे सऱ्हासपणे उल्लंघन करत होते. यामुळे संचारबंदी काळात गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांवर निवडणूक लढविण्यास आजीवन बंदी घालण्यात यावी अशी मागणी डावात मचळा पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन डावात मचळा पार्टीद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त मुंबई, मुख्यमंत्री कार्यालय तसेच औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना पाठवले आले आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील वर्षभरापासून देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन लागु करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात मागील दीड ते दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कलम १४४ लागु करून ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंध घालून देण्यात आले आहेत. अशा महामारीच्या संकटकाळात काही लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, नेते इत्यादी आपल्या राजकीय स्वार्थापोटी लोकांच्या जीवाशी खेळून गर्दी जमवून अनेक कार्यक्रम घेत आहेत. त्याविरोधात संबंधित लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार नेते यांच्यावर कलम १४४ चा उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही निर्बंध घातले त्याचेच ह्या नेत्यांनी उल्लंघन केल्याने शासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. न्यायालयाने देखील त्यांना फटकारले, परंतु त्यांना केवळ न्यायालयाचे फटकार व गुन्हे दाखल करून चालणार नाही तर त्यांना कायम स्वरूपी आजीवन निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालणे जरुरी असल्याने त्यांना कायम स्वरूपी निवडणूक लढण्यावर बंदी घालावी. अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या लोकप्रतिनिधी आमदार खासदार नेते यांच्यावर कुठल्याही प्रकारची निवडणूक लढविण्याची आजीवन बंदी घालावी जेणे करून उर्वरित लोक प्रतिनिधी याचा बोध घेतील. वरील गंभीर विषयाची नोंद घेऊन योग्य ती कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे डावात मचळा पार्टीचे जिल्हाध्यक्ष नवनीत तापडिया यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!