🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये शनिवार आणि रविवार रोजी पूर्णतः लॉकडाऊन जाहीर केले आहे. या दौरान औद्योगिक परिसर, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, किराणा दुकाने, वाहन दुरुस्ती, बांधकाम असे व अन्य आस्थापना सुरू ठेवण्यात आले आहे. परंतु असे असले तरी शहरातील सुरु ठेवण्यास परवानगी दिलेल्या बहुतांश दुकानदारांनी उत्स्फुर्द्पणे लॉकडाऊन पाळल्याचे दिसून आले.
या शनिवार रविवार दोन दिवसाच्या कडक लॉकडाऊन मध्ये मीडिया संदर्भातील सेवा, दूध विक्री व पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय) रिक्षा इ. बांधकामे, उद्योग व कारखाने, किराणा दुकाने, चिकन, मटण, अंडी, मास व मच्छी दुकाने, वाहन दुरुस्ती दुकाने/वर्कशॉप, पशु खाद्य दुकाने बँक व पोस्ट सेवा आदींना मुभा देण्यात आली होती.
परंतु शहरातील बहुतांश भागातील दुकाने बंद पाहायला मिळाली. दुध डेअरी सुद्धा शहरातील विरळक ठिकाणी चालू होत्या. एसबीओ समोर मोठ्या संख्येने भरणारी भाजी मंडीत आज फक्त तीन ते चार व्यापारी पाहायला मिळाले. छावणी परिसर, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर आदी भागातल्या भाजीमंड्या देखील आज बंद होत्या. मास, मटण, अंड्याच्या दुकानाही बहुतांश ठिकाणी बंद होत्या. रस्त्यावर प्रवाशी नसल्याने रोज गर्दी करणाऱ्या रिक्षा आज दिसेनाशा झाल्या होत्या. यामध्ये पेट्रोल पंप आणि मिडिया सुरळीत सुरु असल्याचे दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
- कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या पथकालाच ठोठावला दंड!
- लॉकडाऊनच्या पाहणीसाठी तिनही उच्चपदस्थ अधिकारी रस्त्यावर!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू
- कानड्यांची मुजोरी सुरूच ! मराठी बोर्डांना फासलं काळं
- कर्नाटकातून आलेला १३ लाखांचा गुटखा जप्त


