Share

औरंगाबादकर लागले कामाला! १० दिवसांत ३२ हजार नागरिकांचा सिटी बसने प्रवास

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी बससेवा देखील बंद करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली शहर बससेवा ८ जूनपासून रस्त्यावर उतरली आहे. ८ जून ते १७ जून या दहा दिवसांच्या कालावधीत एकुण ३० हजाराहून अधिक औरंगाबादकरांनी स्मार्ट सिटी बसने प्रवास केला तर एकुण ६ लाख ७८ हजारांचे उत्पन्न सिटी बसने मिळवल्याची माहिती स्मार्ट सिटी बस विभागाने दिली.

फेब्रुवारी कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अचानक उसळी मारली. मार्च महिन्यात तर जिल्ह्यात तब्बल ३२ हजार ३१३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा ताण वाढला. दररोज हजार ते बाराशे रुग्ण आढळून येण्याला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ब्रेक लागला. सध्यस्थितीत शहरातील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

या पार्श्वभूमीवर ७ जूनपासून औरंगाबाद पूर्णत: अनलॉक करण्यात आले आहे. ८ जूनपासून स्मार्ट सिटी बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी १६ बसेस पाच मार्गांवर धावल्या. त्यानंतर हळूहळू बसेसमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहाच दिवसात ३२ हजार ५०० औरंगाबादकरांनी स्मार्ट सिटी बससेवेचा लाभ घेतला आहे. तर एकूण ६ लाख ७८ हजारांचे उत्पन्न आत्तापर्यंत मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!