🕒 1 min read
धुळे : औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे. फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.
राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन निर्णयावर ‘औरंगाबाद’च्या अगोदर ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला गेला आहे. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत सरकाकडून औरंगाबादच्या राम भोगले यांची निवड करण्यात आली. यावेळी सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरवर त्यांच्या नावासमोर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय.
या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचा पारा चढला आहे. त्यांनी ‘हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा’ असं थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा द्यावा अशी मागणी जलील यांनी केली आहे. निवडणूक आली की हे धंदे सुरू होतात. ज्या अधिकाऱ्याने या जीआरवर सही केली त्यांना बडतर्फ करावे. तूम्ही तुमच्या मर्जीनुसार शहराचं नाव बदलू शकत नाही. सरकार तुमचं आहे, हिम्मत असेल तर करून दाखवा असा इशारा जलील यांनी दिला आहे.
यावर शिवसेनेचे नेते तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी खा.जलील यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिवसेना अशी आव्हानं गेल्या ५५ वर्षापासून स्वीकारत आहे. शिवसेना आजकालची नाही. जलील यांनी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात कधी आला ते पाहावे. शिवसेनेचा उगम १९६६ पासून झाला आहे. तेव्हापासून असे आरोप-प्रत्यारोप, आव्हान, टोले अशा सगळ्यांना भुईसपाट करुन भगवा फडकावला आहे. तसंच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, असे प्रत्युत्तर सुभाष देसाई यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप
- “इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

