औरंगाबादः कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अजूनही औरंगाबाद शहरातील शाळा पूर्ववत सुरू झालेल्या नाहीत. महानगरपालिका आयुक्त अास्तिक कुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत आज निर्णय होणार होता. मात्र आता हा निर्णय आणखी ५ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. १५ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल.
महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी याबाबत माहिती दिली. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत शहरातील शाळा सुरु होण्यासंबंधी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती टेंगळे यांनी दिली. पुणे-पिंपरी चिंचवड आणि नाशिक महापालिकेचा निर्णय लांबणीवर पडल्यानंतर औरंगाबाद मनपाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आली आहे.
ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर १० डिसेंबरला शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असे आस्तिक कुमार पांडेय म्हणाले होते. आता औरंगाबाद शहरातील कोरोना स्थिती सामान्य असल्यामुळे शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे अजूनही शाळा सुरू होण्याबाबत निर्णय झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेत्री अथिया शेट्टी वापरते ‘या’ क्रिकेटपटूचे कपडे! ; फोटो व्हायरल
- क्रांती-समीर वानखेडेंनी गुगल,ट्विटर आणि फेसबुकला खेचले न्यायालयात
- ‘भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे मविआचे कुठलेच कर्तृत्व नाही’
- …’शाहजादे’ राज्य करत आहेत; कोहलीच्या कर्णधार पदावरून राऊतांची प्रतिक्रिया
- नितेश राणेंचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज; हिम्मत असेल तर….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

