Share

ऐकावे ते नवलच… औरंगाबाद पोलिसांकडून काँग्रेसच्या २५ सायकलींवर गुन्हा दाखल

Published On: 

औरंगाबाद : महागाईच्या विरोधात शहर युवक काँग्रेस शहरातील गांधीपुतळा ते भडकल गेट असे सायकल यात्रेचे नियोजन केले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुपारी सायकल यात्रा काढली देखील. परंतु कोरोना निर्बंधांमुळे यात्रेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्या अनुषंगाने सिटीचौक पोलीस ठाण्यात पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे आरोपी म्हणून त्यांनी २५ सायकलींचा उल्लेख केला.

वाढते पेट्रोल-डिझेलचे दर, महागाईचा वाढता आकडा याला अनुसरून शहर युवक काँग्रेस शुक्रवारी कार्त्याकार्त्यांच्या उपस्थितीत सायकल यात्रा काढली. शाहगंज गांधी पुतळा ते भडकल गेट असा यात्रेचा मार्ग होता. हा मार्ग सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे सपोनि सय्यद मोहसीन अली अझहर अली यांनी शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात फिर्याद देत कोरोना निर्बंध मोडल्यामुळे गुन्हा दाखल केला.

दरम्यान, दैनंदिन गुन्हे आढावामध्ये आरोपीच्या रकान्यात सिटीचौक पोलिसांकडून २५ सायकलीवर दाखल करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे आता कार्यकर्त्यांबरोबरच सायकलीवर देखील गुन्हे दाखल होत असल्याची चर्चा शहरात सुरु होती. तर अल्ताफ लतीफ पटेल, विलास बापू औताडे, निलेश पवार, अरुण शिरसाठ यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!