औरंगाबाद – केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी औरंगाबादेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध केला गेला. सोमवारी शहरातील क्रांती चौक ते पैठण गेट दरम्यान गाडी ढकलो आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘महागाईचा उडाला भडका, केंद्र सरकारला द्या तडका’, ‘उठा उठा महागाई आली, मोदी सरकार जाण्याची वेळ आली’, ‘वाह रे मोदी तेरा खेल , सस्ती दारू महेंगा पेट्रोल’ इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सामान्य जनतेचे जगणे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस इंधनाच्या दरात वाढ होत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच आता इंधन दरवाढीचा दुहेरी सामना नागरिकांना करावा लागत आहे. इंधनाची सतत होणारी वाढ सामान्य जनतेची झोप उडविणारी ठरत आहे. वाढत्या महागाईचा भार मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेवर पडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उत्पन्न कमी आहे. बँकांमध्ये कर्जाचा बोजा वाढल्याने आणि नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असतानाच आता इंधन दरवाढीचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलनाद्वारे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष कय्यूम शेख, शहर सरचिटणीस रवी तांगडे पाटील, शहर सचिव नागेश भालेराव, पंकज अंभोरे, अमोल देशमुख, अमोल ताटे, सुनिल बनकर, सचिन भांबट, मयूर कालभिले, पंकज पेंडकर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र शासनाने संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव या संवेदनशील भागात जाण्यास बंदी घालावी’
- मुंबई हायकोर्टाची सुनावणी, कंगनाला आणखी एका आठवड्याचा दिलासा
- मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी परीक्षांच्या नव्या तारखा केल्या जाहीर
- आमची सुरक्षा कमी केल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही : चंद्रकांत पाटील
- आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाईंची सुरक्षा वाढवली; मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
