मुंबई : देवेंद्र फडणवीस हे काल जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली यावेळी त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी गिरीश महाजनदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव दौऱ्यात फडणवीस एकनाथ खडसेंच्या घऱी गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
या भेटीवर आता भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणात कोणीच कोणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. राजकारणात केवळ वैचारिक विरोध केला जातो. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गिरीश महाजन यांच्या मनात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी कटुता नाही, असं सांगतानाच फडणवीस यांच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये,’ असं आवाहन रक्षा खडसे यांनी केलं आहे.
‘राजकारणात वैचारिक द्वेष असतो. वैचारिक विरोध केला जातो. पण कोणीच कुणाचा वैयक्तिक शत्रूही नसतो. नाथाभाऊंचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. नाथाभाऊंनीही कधी कुणाच्या बद्दल मनात द्वेष ठेवला नाही. राजकीय प्रतिक्रिया द्यायची असते, ती दिली जाते. पण कुणाबद्दल कधीच वैयक्तिक द्वेष नसतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या मनातही नाथाभाऊंबद्दल कोणताही कटुता नाही, असं रक्षा खडसे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्धवजी… जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका’
- ‘ओबीसी समाजावर अन्याय होत असताना भुजबळ, वड्डेट्टीवार हे नेते मात्र सत्तेत रममाण झाले’
- ‘सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून भाजपचे नेते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत’
- कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये – सुप्रिया सुळे
- पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलनाचा धडाका सुरू


