मुंबई : चीनमध्ये एका माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा धक्कादयक प्रकार उघडकीस आला आहे. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी चीनमधील जिआंगसु भागात बर्ड फ्लूचे H10N3 स्ट्रेनसोबत एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली आहे. झेंजियांग शहरात 41 वर्षीय एका व्यक्तीमध्ये बर्ड फ्लू स्ट्रेन सापडला.
सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. अशा प्रकारे माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना आहे. या व्यक्तीला बर्ड फ्लूच्या प्रकाराचा संसर्ग कसा झाला ?, हे शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.या रुग्णाला एच10एन3 म्हणजे एव्हिअन एन्फुएन्झा विषाणूची (बर्ड फ्ल्यू) लागण झाल्याचे 28 मे रोजी निदान झाले होते, असे आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, त्यात या व्यक्तीला ही लागण कशी झाली याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आला नाही.
China confirms first human case of H10N3 bird flu https://t.co/qkCTlwW9Ly pic.twitter.com/4mbNNOUiHl
— New York Post (@nypost) June 1, 2021
एच10एन3 हा तुलनेने कमी क्षमतेचा विषाणू आहे. तो मुख्यत: पोल्ट्रीत आढळतो. तो पसरण्याची भीती खूप कमी आहे. या विषाणूचे वेगवेगळे अवतार चीनमध्ये आढळतात. दरम्यान, या विषाणूची मानवाला बाधा झाल्याचे जगात अन्यत्र एकही उदाहरण अद्याप आढळलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्धवजी… जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका’
- ‘ओबीसी समाजावर अन्याय होत असताना भुजबळ, वड्डेट्टीवार हे नेते मात्र सत्तेत रममाण झाले’
- ‘सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून भाजपचे नेते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत’
- कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये – सुप्रिया सुळे
- पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलनाचा धडाका सुरू


