🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मध्यतंरी वॉर्ड आरक्षणावरून अनेकांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात केलेली प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक असल्याचा दावा मनपाने केला आहे. वादग्रस्त वॉर्ड रचना आणि मध्यंतरी कोरोनाचा कहर यामुळे वर्षभरापासून मनपाचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात आहे. दरम्यान, आज मंगळवारी (दि.९) सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार यांच्यासमोर हे प्रकरण येणार आहे.
रजिस्ट्रार यांच्यासमोर प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी रजिस्ट्रार यांच्याकडे म्हणणे मांडले असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त तथा विधी अधिकारी अपर्णा थेटे यांनी सांगितले. महापालिकेची मुदत संपल्याने गतवर्षी निवडणुका प्रस्तावित होत्या.
निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने आरक्षण सोडत, वार्ड रचना व मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया केली होती. परंतु ही वॉर्ड रचना तयार करत असताना नियमांना डावलण्यात आले. असा आरोप करत या वॉर्ड रचनेविरुद्ध अनेकांनी न्यायालयात धाव घेतली होती.
प्रकरण थेट सर्वोच्च कोर्टात पर्यंत गेले. सुप्रीम कोर्टाने देखील याचिका दाखल करून घेतली. दरम्यान, याप्रकरणी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, निवडणूक विभाग उपायुक्त, यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले. यानुसार अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सादर केले असल्याचे मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
मात्र, यामध्ये साखर आयुक्तांचे म्हणणे सादर झाले नव्हते. आज मंगळवारी महापालिकेचे वादग्रस्त वार्ड रचना प्रकरण रजिस्ट्रार यांच्यासमोर येणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची तयारी करून बसलेले अनेक पक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष लावून बसले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल ७५ रुपयांवर येणार? अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत दिलं उत्तर
- सैराट फेम परश्याचा कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
- मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, मात्र… बीएमसी आयुक्तांचं महत्वाचं विधान
- राहुल गांधींना शाळेत पाठवण्यात यावं; भाजप मंत्र्याची टीका
- ‘बाबासाहेब आंबेडकरांची माणसाला माणसाशी जोडणारी नीती होती, तोडणारी नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
