औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खासदार इम्तियाज जलील यांनी नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी समाज माध्यमावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांची पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये खासदार जलील यांनी भारताचा चुकीचा नकाशा टाकला. त्यावर आमदार अतुल सावे यांनी फेसबुकवर चुकीच्या नकाशाबद्दल पोष्ट करत इम्तियाज जलील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे.
https://www.facebook.com/atulsave.india/posts/3588496694590623
प्रजासत्ताक दिनानिमित्त इम्तियाज जलील यांनी शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये भारताचा चुकीचा नकाशा असल्याचे आमदार अतुल सावे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ इम्तियाज जलील यांची ही पोष्ट फेसबुकवर टाकत खा. इम्तियाज जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आ. अतुल सावे यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे.
आ. सावे म्हणाले, खासदारांचे आपल्या भारत देशाविषयी अज्ञान की त्यांची देशाच्या सीमेविषयी हीच समजूत आहे? की त्यांच्याकडून झालेली चूक आहे? संविधानाने दिलेल्या देशाच्या आणि पदाच्या प्रत्येकास माहिती हव्यात, असे म्हणत खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे अतुल सावे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. आता यावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सीमाभागातील बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आहे, हे दाखवण्याची आता वेळ आली आहे’
- भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी राम मंदिर निर्माणासाठी दिला तब्बल ‘इतका’ निधी!
- प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचे शानदार उद्घाटन
- तासगावच्या उपनगराध्यक्षपदी दत्तात्रय रेंदाळकर यांची एकमताने निवड; शहरात जल्लोष
- शेतकरी आंदोलन फुटीच्या उंबरठ्यावर ? व्ही एम सिंह यांच्या गटाची आंदोलनातून माघार


