Share

Aurangabad MNS Sabha : राज ठाकरेंना खासदार इम्तिजाय जलील यांनी दिले इफ्तार पार्टीचे आमंत्रण; म्हणाले, “जे राजकारणासाठी…”

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादमधील सभेला अटीशर्तींसह परवानगी मिळाली असून सभेसाठी केवळ १५ हजार जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. त्यातच औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtizay Jalil) यांनी राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे.

“मनसे प्रमुख राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादेत रॅलीसाठी येत आहेत. मी त्यांना इफ्तारसाठी आमंत्रित करतो. आपण एकत्र बसू, यातून देशात चांगला संदेश जाईल. ९९% लोक शांतताप्रिय आहेत, फक्त १% लोक अशांतता निर्माण करतात. माझा विश्वास आहे की, अशा १ % लोकांवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस सक्षम आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे किंवा समाजाचे असोत.”,असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी ‘जे राजकारण करण्यासाठी आले आहे त्यांनी राजकारण करावे; मात्र ज्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांना प्रार्थना करू द्यावे.’ असेही जलील यांनी म्हटले आहे. दरम्यान दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील, असा इशारा भीम आर्मीने मनसेला दिला आहे. यामध्ये सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!