🕒 1 min read
बीड :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 साठी आज सकाळी 8 वाजता मतदान उत्साहात व शांततेत सुरुवात झाली, सायंकाळी 5 पर्यत मतदान बजावण्यासाठी नागरीकानी मोठ्या प्रमाणात रांगा लावण्यात आल्याचे दिसून आले होते.
जिल्ह्यातील 131 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे अंतिम टक्केवारी 62.08 झाली होती.जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उत्साहात मतदान झाले. परळी , गेवराई , माजलगाव, बीड, आष्टी, केज, अंबाजोगाई, वडवणी, धारुर, शिरुर कासार, पाटोदा या प्रमुख शहरासह जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यामध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी पुरुष 50310, महिला 13126 अशी एकूण 63 हजार 126 इतकी मतदारसंख्या आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यत प्राप्त झालेल्या अंदाजानुसार एकूण 39 हजार 382 मतदारांनी मतदान केले असून झालेल्या मतदानाची अंदाजे अंतिम टक्केवारी 62.08 इतकी आहे. सदर अंदाजे टक्केवारी सर्व मतदान केंद्रांचे अंतिम अहवाल पडताळून पाहिल्यानंतर अधिकृत आकडेवारी अंतिम केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-
पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग् त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार का?
-
‘मिळाली सत्ता घ्या गपगुमान ही काँग्रेसची अवस्था’
-
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
-
कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही – उर्मिला मातोंडकर
-
भाजप खासदाराचा कोरोनामुळे मृत्यू तर ‘या’ खासदाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
