Share

मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या कारभाराचा औरंगाबाद काँग्रेसकडून निषेध

Published On: 

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारने जनतेच्या हिताचे कुठलेही निर्णय घेतले नाहीत. या कारभाराचा निषेध म्हणून आज रविवारी (दि.३०) काँग्रेसच्या वतीने शहरातील शहागंज येथील गांधी पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘वा रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा तेल’ म्हणत मोदी सरकारच्या महागाईच्या धोरणावर औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने टिका करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या ७ वर्षांच्या काळ्या कारभाराचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यभरात निदर्शने करण्यात आली. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहे. मागील सात वर्षांमध्ये मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करून टाकला आहे.

काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षांमध्ये देशाला समृद्ध स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने उभे केले. त्याची पुरती वाताहत लावून मोदींनी देश रसातळाला नेला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावेळी शहांगज येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत निदर्शने करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, किरण डोणगावकर, इक्बाल सिंह गिल, मोहसीन खान, निलेश अंबेवाडीकर, मोहित जाधव, सुरेखा पानकडे, उज्जवला दत्त, निमेश पटेल आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!