मुंबई : भारतीय डाक विभागाकडून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अनोखा सन्मान देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणारे. मुंडे यांच्या पुण्यतिथी दिनी भारतीय डाक द्वारा त्यांची प्रतिमा असलेल्या तिकिटाचे प्रकाशन थेट दिल्लीवरून होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा गोपीनाथ गडावर ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार आहे. याबाबत ‘सामना’ने वृत्त प्रकाशित केले आहे.
वृत्तानूसार, यंदाच्या पुण्यतिथी दिनी म्हणजे ३ जून रोजी भारतीय डाक विभागाकडून गोपीनाथ मुंडेंचा त्यांचे छायाचित्र असलेल्या तिकिटाचे प्रकाशन करत गौरव केला जाणार आहे. हे उदघाटन कोणाच्या हस्ते होणार याबद्दल माहिती भेटू शकली नाही. हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. याआधी भगवान बाबा, यशवंतराव चव्हाण, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अशा महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींच्या तिकिटाचे प्रकाशन भारतीय डाक कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे.
भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी ३ जूनला असते. प्रतिवर्षी गोपीनाथ गडावर मुंडेंच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून हजारो समर्थक उपस्थित राहत असतात. पण, कोरोना संकटामुळे गेले वर्षी प्रतिवर्षी होणारा सोहळा आयोजकांकडून रद्द करण्यात आलेला होता.
यावर्षीही कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा कुठल्याही गर्दीविनाच होण्याची शक्यता आहे. आपल्या लोकनेत्याचा होत असलेल्या या सन्मानामुळे बीड जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अशोक चव्हाणांच्या पाठपुराव्याला यश, नांदेडला स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय मंजूर
- धक्कादायक! अपहृत मुलीच्या शोधासाठी बीडच्या पोलीस अधिकाऱ्याकडून ४० हजारांची मागणी
- मोबाईल ॲप डाऊनलोड करायला लावून २५ हजारांचा गंडा
- पीक विमा मिळत नसल्याने महिला शेतकरी करणार आंदोलन
- ‘गायकवाड अहवाल हा उद्धव ठाकरेंना समजलाच नाही’, संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका


