Share

‘पीक विमा कंपन्यांची नार्को टेस्ट केल्यावरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल’, मंत्री अब्दुल सत्तार आक्रमक

Published On: 

औरंगाबाद : पीक विमा कंपन्यांनी काहीतरी मॅचफिक्सिंग केली. त्या विमा कंपन्यांची नार्को टेस्ट व्हावी. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल. यातून सत्य समोर येईल. कोरोनाच्या काळात विमा कंपन्यांनी पाच हजार कोटींच्यावर फायदा करुन घेतला असा आरोप शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय.

कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी औरंगाबादेत खरिप आढावा बैठक पार पडली. या बैठीकतच सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कृषी विभागाचा भोंगळ कारभार देखील चव्हाट्यावर आणला. उदाहरण म्हणून अब्दुल सत्तार यांनी आपल्याच सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील पीक नुकसान, कापणी अहवाल व इतर कामातील गलथानपणा पुराव्यानिशी कृषी मंत्र्यांसमोर मांडला. सत्तार म्हणाले, माझ्या सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात पीक कापणी झाली. त्यामध्ये जी कमिटी आहे, त्यात सरपंच, कृषी सहायक आणि याचा कंट्रोल करणारा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बोगस पीक कापणी दाखवली. ती कागदावरच दाखवली. ते गावांत गेले नाही.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांचा ९८ टक्के पीक विम्याची रक्कम केंद्र व राज्य सरकारने दिली आहे. ५८०० कोटी रुपयांचा पीक विमा या कंपन्यांनी जमा केला आहे. पण नुकसानीपोटी फक्त १ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. म्हणजे तब्बल ४८०० कोटी रुपयांचा नफा या कंपन्या आपल्या घशात घालू पाहत आहे.

तालुका कृषी अधिकारी, तहसिलदारांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे. माझ्या मतदारसंघातील १ लाख शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले. मी गेल्या ४९ वर्षांपासून राजकारण करतोय. पहिले असे वर्ष आहे जिथे कमी पिकविमा मिळाला आणि २६० टक्क्यांनी वाढ दाखवली गेली. १५४ लोकांनी आत्महत्या केल्या. विम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. याची सर्व जबाबदारी पिकविमा कंपनी, तहसिलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यावर राहिल, असे सत्तार यांनी बजावले.

सत्तार म्हणाले, की यावर कृषी मंत्र दादा भुसे यांनी कृषी सचिव व कृषी आयुक्त यांची समिती स्थापन करुन आठ दिवसांच्या आठ निर्णय दिला जाईल, असे सांगितले. तो आला नाही, तर नाईलाजस्तव लोक, शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. न्यायालयीन लढाईही लढवली जाईल, असा इशारा सत्तार यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!