Share

धक्कादायक! अपहृत मुलीच्या शोधासाठी बीडच्या पोलीस अधिकाऱ्याकडून ४० हजारांची मागणी

Published On: 

बीड : अल्पवयीन १७ वर्षीय मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी दलालामार्फत ४० हजारांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे समोर आला. लाच मागणीच्या प्रकरणाने सहायक निरीक्षक अनिल गव्हाणकर अडचणीत आले आहेत. यासदंर्भातील व्हाईस रेकॉर्डिं गस मुलीच्या पालकाने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, दिंद्रूड ठाणे हद्दीतील १७ वर्षीय मुलगी एप्रिल २०२१ मध्ये बेपत्ता झाली होती. मुलीच्या वडिलांनी २५ एप्रिल रोजी दिंद्रूड ठाण्यात तक्रार दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. दरम्यान, मुलीच्या शोधासाठी वाहन भाडे व खर्चासाठी म्हणून दलाल हनुमान फपाळ याच्याकरवी सहायक निरीक्षक अनिल गव्हाणकर यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. यातील १५ हजार रुपये सुरुवातीला दिले होते. उर्वरित रक्कमेसाठी हनुमान फपाळ हा अपहृत मुलीच्या वडिलांकडे तगादा लावत असल्याचे व्हाईस रेकॉर्डिंग व्हायरल झाली.

दरम्यान, २० मे रोजी यासंदर्भात अपहृत मुलीच्या वडिलांनी सहायक निरीक्षक अनिल गव्हाणकरांसह दलाल हनुमान फपाळ याच्याविरुध्द पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्याकडे तक्रार केली. मुलीचा अद्याप तपास लागलेला नाही, त्यामुळे तिचा शोध घ्यावा तिच्या शोधासाठी पैसे उकळणाऱ्या अधिकारी व एजंटाविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तो मी नव्हेच
यावर व्हाईस रेकॉर्डिंगमध्ये माझ्या नावाचा उल्लेख नाही. तक्रार निराधार आहे. अशा प्रकारे कोणाकडेही पैशांची मागणी केलेली नाही. त्या रेकॉर्डिंगशी संबंध नाही, असे दिंद्रूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर यांनी प्रतिक्रिया दिली.

चौकशीनंतर कारवाई
या प्रकरणात आपल्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. या संदर्भात आपण चौकशीचे आदेश दिले असून चौकशीचा अहवाल येताच कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक ए. राजा यांनी माध्यमांना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!