हिंगोली : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा शेतकऱ्यांना होणारा पीक कर्ज पुरवठा तीन वर्षात अत्यंत खालावला आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा तुमची खैर नाही अशी ताकीद शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या पीक कर्ज वाटप संदर्भात राष्ट्रीयकृत बँकाना येणाऱ्या अडचणी बाबत घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत खासदार हेमंत पाटील बोलत होते. या बैठकीस हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी खा. पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे सुरळीत होऊन शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी, यासाठी बँकांना महत्वपूर्ण सूचना केल्या. बँकेचे अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाहीत तसेच शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत, याबद्दल नाराजी व्यक्त करीत हे पुन्हा होऊ देऊ नका, अशी स्पष्ट ताकीद दिली.
तक्रार निवारण कक्ष तयार करा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप संदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण त्वरीत करण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात तक्रार निवारण कक्ष तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा जास्तीत जास्त होण्यासाठी लाईन ऑफ अँक्शन ठरवून प्रत्येक बँकेने आठ दिवसांचे शेड्यूल येत्या दोन दिवसात द्यावे अशा सूचनाही केल्या.
दत्तक गावांची यादी प्रसिद्ध करा
बँकेकडे असलेल्या दत्तक गावांची यादी तयार करून ती वर्तमानपत्रात प्रकाशित करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय टाळली जाईल, बँक प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करावी. त्यामुळे बँकांतील अनावश्यक गर्दी कमी होऊन शेतकऱ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पीक विमा कंपन्यांची नार्को टेस्ट केल्यावरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल’, मंत्री अब्दुल सत्तार आक्रमक
- लोकनेत्याचा अनोखा सन्मान! पुण्यतिथी दिनी होणार गोपीनाथ मुंडेंच्या तिकिटाचे प्रकाशन
- अशोक चव्हाणांच्या पाठपुराव्याला यश, नांदेडला स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय मंजूर
- धक्कादायक! अपहृत मुलीच्या शोधासाठी बीडच्या पोलीस अधिकाऱ्याकडून ४० हजारांची मागणी
- मोबाईल ॲप डाऊनलोड करायला लावून २५ हजारांचा गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

