औरंगाबाद : टाऊन हॉल भागातील खड्डयांना मनपा प्रशासन जबाबदार आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.२९) पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची विशेष भेट घेऊन निवेदन दिले. तसेच कोरोनाच्या गेल्या दिड वर्षांच्या काळात शहरात कुठलीही विकासकामे झालेली नाही. उलट स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात लाखोंची उधळपट्टी, भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याआधीही काँग्रेसने मनपा आयुक्तांच्या भूमिकेस वेळोवेळी विरोध केला आहे. त्यामुळे आता ‘मनपा आयुक्त हटाओ शहर बचाव’ ही मोहीमच काँग्रेसने सुरू केली आहे.
शहरातील मकाई गेट ते टाऊन हॉल रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची महानगरपालिकेतर्फे त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. यासाठी काँग्रेसच्या इंटक विभागाने गुरुवारी मनपा प्रशासनाविरुद्ध रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले. त्यानंतर पोलीस आयुक्तांची भेट घेत मनपा प्रशासकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ‘काँग्रेस विरुद्ध मनपा आयुक्त’ हा वाद या आधी देखील अनेकदा उफाळला आहे. शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्याचे ठरवले होते.
त्यावेळी काँग्रेस नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. त्यावेळी देखील काँग्रेसने मनपा आयुक्त शिवसेनेचे आहेत की शहराचे? असा प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी २०२१ मध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन केले जाणार होते. त्यावेळी देखील या कार्यक्रमांचे निमंत्रण काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळालेले नाही. शहरातील शिवसेनेच्या विविध बॅनरवरुन ‘महाविकास आघाडी’ला वगळण्यात आले होते. मनपा आयुक्तांची आमच्यासोबत कुठली नाराजी आहे ते समजत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली होती. तेव्हापासून आजतागायत हा वाद मिटलेला नाही. आता या वादात एक नवा अध्याय सुरू होताना दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबादेत ३०० डॉक्टरांना प्रशिक्षण- जिल्हाधिकारी
- रणबीर-आलियानंतर केआरकेचा सिद्धार्थ-कियारावर निशाणा, म्हणाला…
- ‘विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप आणि हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध करणार’, सोनू सूदने वाढदिवसानिमित्त व्यक्त केली इच्छा
- ‘प्रत्येकवेळी अभिमान वाटेल अशी कामगिरी केली’, प्रियांकाकडून मेरीकोमचं कौतुक
- काही कठोर निर्णय घ्यावे लागणार अन्यथा ‘हे’ संकट संपणार नाही – उद्धव ठाक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

