मुंबई : कमाल आर खान हा नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अनेक इंडस्ट्रीतील लोकांवर केआरके टीका करतो. काही दिवसापूर्वी त्याने एक व्हिडीओ पोस्ट करत सलमानच्या राधे सिनेमाविषयी टिका केली होती. या प्रकरणात त्याला कोर्टाने सलमानविरुद्ध टिका करण्यापासुन रोखण्यात आले होते. मात्र तरी देखील त्याचे असे वागणे थांबले नाही. सध्या तो एका न अनेक कलाकारांवर हल्लाबोल करत आहे. यातच त्याने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्याविषयी वक्तव्य केले आहे.
Prediction 21- No Kiara Advani film will become hit till she Is girlfriend of Sidharth Malhotra!
— KRK (@kamaalrkhan) July 28, 2021
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत. या दोघांच्या नात्यावरंच आता केआरकेने त्याची प्रतिक्रिया देत एक ट्विट करत म्हणाला, ‘ती सिद्धार्थ मल्होत्राची गर्लफ्रेंड असेपर्यंत कियारा आडवाणीचा एकही सिनेमा हिट होणार नाही’ , त्याच्या या ट्वीटमुळे एक चर्चा रंगली असून यावर अनेक प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटत आहे.
काही दिवसांपासून बॉलिवूड गायक मिका सिंग आणि केआरकेमध्ये वाद सुरु आहेत. तसेच त्याने यापूर्वी गोविंदा, शाहरुख, सलमान खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर, विद्या बालन या सगळ्यांवर केआरकेने मागील काही दिवसांत निशाणा साधला होता. तसेच त्याने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याबद्दल देखील भाकीत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’


