औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपली आरोग्य यंत्रणा आता पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंच्या पाठीमागील कारणांचा आपण शोध घेतला आहे. या अभ्यासातून आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्या दृष्टीनेही प्रशासनाने जवळपास तीनशे डॉक्टरांना लहान बालकांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.३०) आयोजित बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कोविड आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, अनेकांना आत्तापर्यंत कोरोनामुळे जीव गमवावे लागले आहेत. कोरोनावर वेळेत योग्य उपचार घेतल्याने जिल्ह्यातील १ लक्ष ४३ हजार ५५० रूग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु अजूनही कोविडचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी मास्कचा वापर, शारीरिक अंतर, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.
त्याचबरोबर प्राधान्याने लसही घ्यावी. आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह असलेल्या कोविड रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्यावा. नागरिकांच्या चाचण्या करण्यावर अधिकाधिक भर द्यावा. रिक्षा चालक, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, दुकानदार आदी सुपर स्प्रेडर असणाऱ्या व्यक्तींचीही चाचणी करावी. म्युकरमायकोसिसच्या आवश्यक औषधी उपलब्धतेबाबतही खात्री करावी. जिल्ह्यात २४ ठिकाणी ऑक्सीजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी चार प्लांट उभारलेले आहेत. उर्वरीत प्लांट लवकरात लवकर उभारावेत, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
डॉक्टरांना प्रशिक्षण
संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्या दृष्टीनेही प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये आयसीयू, व्हेंटीलेटरसह एकूण ६३१ बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये ४५ व्हेंटीलेटरचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अजून २८ व्हेंटीलेटर सीएसआर निधीतून उपलब्ध झालेले आहेत. जवळपास ३०० डॉक्टरांना लहान बालकांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे मेट्रोच्या मुद्यावरून श्रेयवादाची लढाई सुरु; अजितदादांमुळेच मेट्रो रूळावर आल्याचा राष्ट्रवादीचा दावा
- ‘ज्या क्षणी अनिल देशमुख ‘अज्ञातवास’ मधून बाहेर येतील, सीबीआय आणि ईडी त्याला अटक करतील’
- ‘सामूहिक आत्मबलिदान’ करण्यास परवानगी द्या, पीएचडीधारक संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
- पुराचा धोका कायम उद्भवणाऱ्या गावांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
- शिक्षणमंत्र्यांनी ‘फी’ माफीबाबत जाहीर केलेल्या निर्णयाचा तीव्र निषेध- मेस्टा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

