कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा कोल्हापूर दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर आज(दि. ३० जुलै) रोजी ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शिरोळ तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी भागातील पाहणी केली. यानंतर सर्व अधिकारी, आमदार, खासदार, जिल्ह्यातील मंत्री यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
‘आपल्याला गावांचं पुनर्वसन करावं लागेल. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. कठोर निर्णय घेतले नाही तर पाठी लागलेलं संकट आपल्याला सोडणार नाही. जेव्हा हे निर्णय घेऊ त्यावेळी त्याला साथ द्या,’ असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी पूरबाधित गावांसह जिल्ह्यातील अतिक्रमण असलेल्या भागातील नागरिकांना केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘ नदी पात्रात ब्लू आणि रेड लाईन आहे. त्यात झालेली अतिक्रमण आहेत. त्यामुळे पूर येत असतो. आता या पुढे ब्लू लाईन आणि रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देणार नाही. परवानगी देणार असाल तर या लाईन मारू नका. मग या लाईनला अर्थ काय? असं सांगतानाच लोकांचे जीव गमावणं परवडणार नाही. या गोष्टी संकटाच्या निमित्ताने कराव्या लागणार आहेत,’ असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना भेटले- प्रविण दरेकर यांचा आरोप
- फडणवीसांच्या भेटीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘ही भेट बंद दाराआड नाही; पुरामुळे दरवाजेच शिल्लक नव्हते’
- ‘पॅकेज म्हणा किंवा काहीही, पण पूरग्रस्तांना मदत करा’; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
- संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच, लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
- ‘ज्या क्षणी अनिल देशमुख ‘अज्ञातवास’ मधून बाहेर येतील, सीबीआय आणि ईडी त्याला अटक करतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

