Share

‘विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप आणि हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध करणार’, सोनू सूदने वाढदिवसानिमित्त व्यक्त केली इच्छा 

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला अशा परिस्थितीत देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली होती. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला. असे असताना सोनू सूद मदतीसाठी पुढे आला. त्याने केलेले हे काम पाहून लोककांनी त्याचे भर भ्रूण कौतुक केले. आज सोनू सूदचा ४८ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचा शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

एका मुलाखतीत अभिनेता सोनू सूदने आपल्या वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी तो म्हणाला, ‘विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप आणि हॉस्पिटलमध्ये रूग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा आहे. माझ्या देशातील जनतेने माझ्यावर जे प्रेम केलं आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. लोकांच्या मदतीसाठी मी जी मोहिम सुरू केली, ती कोणत्या गाव किंवा राज्यांपुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण देशासाठी आहे. ही मोहिम मला अखंडपणे सुरू करायची आहे,’ अशी एक सामाजिक इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

पुढे तो म्हणाला, ‘माझ्या वाढदिवसा दिवशी काहीजण थेट सायकल आणि बाईकवरून मला भेटायला येत आहेत. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्यापर्यंत मदत वेळेत पोहोचेल.’ असे त्याचे म्हणणे आहे. सोनूचे सध्या देशभरात लाखो चाहते आहेत. अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, कोरोना काळात अनेक गरजूंना मदत पोहोचवण्याचे काम सोनू निःस्वार्थी भावनेने करत आहे. त्याच्यासारख्या व्यक्तीने राजकारणात यावे अशी इच्छा अनेक सेलेब्रीटींनी तसेच सामान्य माणसांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. परंतु यावर त्याने आपला असा कोणताही ही विचार नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!