मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची बॉक्सर मेरी कॉमचा राऊंड १६ फेरीत झालेल्या लढतीत मेरीचा पराभव झाला आहे. मात्र पराभवानंतर मेरी कॉमने केलेल्या कृत्यामुळे चाहत्यांची मने तिने जिंकली आहे.ऑलिम्पिक स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात गुरुवारी भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कॉमचा पराभव झाला. मात्र पराभवानंतर देखील अनेकांनी मेरी कोमच्या कामगिरीचं कौतुक केले. तसेच अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील मेरीचं कौतुक केलं.
This is what the ultimate champion looks like…
Bravo @MangteC… you’ve shown us how to go the distance with passion and dedication. You inspire us and make us proud Every.Single.Time ???????? #Legend pic.twitter.com/jXnoiUEznu
— PRIYANKA (@priyankachopra) July 29, 2021
प्रियांका ट्विटरवर मेरी कोमचा एक फोटो शेअर करत म्हणाली, ‘खरे चॅम्पियन असे दिसतात. खूप छान मेरी कोम! जिद्द आणि निष्ठेच्या जोरावर पुढे जाणं शक्य आहे हे तू दाखवून दिले आहे. तू आम्हाला प्रेरणा दिली आहे, प्रत्येक वेळी तू आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.’ असे म्हणत प्रियांकाने मेरी कोमची स्तूती केली आहे. पराभव झाल्यानंतर मात्र मेरी कॉमने प्रतिस्पर्धी वेलेसिंयाची गळाभेट घेतली आणि तिचे आभिनंदन केले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ही मेरी कॉमची अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा ठरु शकते.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने ‘मेरी कोम’ या सिनेमामध्ये भारताची बॉक्सर मेरी कोमची उत्तम भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी प्रियांका चोप्राने बॉक्सिंगचे धडे घेतले होते. तिने केलेली मेहनत या सिनेमातून पहायला मिळली होती. या सिनेमातील प्रियांकाच्या भूमिकेचे कौतुकही करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना भेटले- प्रविण दरेकर यांचा आरोप
- फडणवीसांच्या भेटीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘ही भेट बंद दाराआड नाही; पुरामुळे दरवाजेच शिल्लक नव्हते’
- Corona Vaccination: अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींना मिळणार आता घरीच लस
- संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच, लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
- ‘ज्या क्षणी अनिल देशमुख ‘अज्ञातवास’ मधून बाहेर येतील, सीबीआय आणि ईडी त्याला अटक करतील’


