औरंगाबाद : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील ३८ सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात, निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली होती तेथून सुरू करण्याचे आदेश दिले होते. यावर विविध जिल्हा बँकांच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना बीड, औरंगाबाद आणि परभणी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत घोषित न करण्याचे अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी कुलकर्णी यांनी बुधवारी दिले आहे.
औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाने जानेवारी २०२० मध्ये शेतकरी कर्जमुक्तीच्या कारणावरून सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या. हे आदेश खंडपीठाने ११ मार्च २०२० ला रद्द केले, परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या निवडणुका पुढे ढकलल्या. मात्र ३० डिसेंबर २०२० च्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या होत्या, तेथून पुढे घेण्याचे आदेश दिले. याचिकेनुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील ३८ सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात, निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली होती तेथून सुरू करण्याचे आदेश दिले होते.
औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या याचिकाकर्त्यांच्या मते, ११ मार्च २०२० चे न्यायालयाचे आदेश हे कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी होते. दरम्यान, शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात केलेल्या दुरुस्तीनुसार, सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आणि त्या अनुषंगानेच निवडणूक घेण्याचा कालावधीही सहा महिन्यांनी वाढला. त्यामुळे मार्च २०२० मध्ये मतदार यादी अंतिम झालेली असेल तर त्याआधारे आता निवडणुका घेणे या संदर्भातील नियमांना अनुसरून नाही. हा युक्तिवाद ग्राह्य धरून खंडपीठाने या तीन बँकांच्या निवडणुका तूर्त न घेण्याचे निर्देश दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली
- ‘बाहेरचे फक्त बघे, ते सामील नसतात’; परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
- ‘…त्यावेळी मुजोर ब्रिटिश सरकारलाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते’
- ‘आता पवार म्हणतील, “त्यांनी” विवाहित व्यक्तीशी लग्न केलंय, त्यामुळे चारित्र्याची चौकशी केली पाहिजे’
- शेतकरी आंदोलनावर सचिन-विराट, रोहितनंतर अनेक क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

