Share

Ambedkar Jayanti 2022 : किती शोभतो ‘भीम’ एक रूपयाच्या नाण्यावर; औरंगाबादच्या कलाशिक्षकाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) निमित्ताने विविध उपक्रम राज्यभरात राबवले जातात. मात्र औरंगाबादचे कर्मवीर श्री. शंकरसिंग नाईक हायस्कूल येथील कलाशिक्षक राजेश निंबेकर (Rajesh Nimbeker) यांच्या अनोख्या कलाची थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोच झाली आहे. त्यांनी एक रूपयाच्या नाण्यावर डॉक्टर आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना कलात्मक अभिवादन केले आहे.

राजेश निंबेकर यांनी 1.5 त्रिज्या असलेल्या एक रूपयाच्या नाण्यावर 35 मिनीट आणि 15 सेकंदात हे व्यक्तिचित्र रंगवले आहे. जगातील हा पहिलाच प्रयोग आहे. त्यांच्या या प्रयोगाची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथातील मार्गदर्शक तत्वे भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापने वेळी मार्गदर्शक ठरली. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक रूपयाच्या नाण्यावर राजेश निंबेकर यांनी आंबेडकरांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

यापूर्वी देखील राजेश निंबेकर यांनी पिंपळाच्या पानावर गौतम बुद्ध यांची रांगोळी काढून विश्वविक्रम केला होता. त्याची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. आता या प्रयोगामुळे त्यांच्या नावावर दोन विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. एवढेच नाही तर त्यांनी फलक लेखन,रांगोळी चित्र ,पोट्रेट, नाट्य,नृत्य, काव्यलेखन, गायन ,या कलेच्या माध्यमातून महामानवांचे विचार समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनी एक रुपयाच्या नाण्यावर काढलेले डॉक्टर आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्राचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022: ‘तेरे को क्या है’ म्हणत दिल्लीच्या ‘धाकड’ फलंदाजानं केली आंब्याची चोरी; खोटं वाटत असेल तर बघा हा VIDEO!

राज ठाकरेंची भूमिका ही दंगल घडविणारी; प्रकाश आंबेडकरांची टीका

INS Vikrant घोटाळा : किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! 

IPL 2022 : हॅट्स ऑफ माही..! विराटला आऊट करण्यासाठी धोनीनं खेळली ‘सुंदर’ चाल; VIDEO व्हायरल!

IPL 2022 MI vs PBKS : आज मुंबई मिळवणार का पहिला विजय? पंजाबविरुद्ध ‘असा’ आहे रोहितसेनेचा रेकॉर्ड!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!