🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पेट्रोलचे दर ५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३ रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. खरे तर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील इंधन दर जास्त रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा जनतेला होती. मात्र हे दर केवळ ५ आणि ३ रुपयांनी कमी केल्यामुळे इतर पक्षातील नेते मंडळींकडून सरकारवर टिका केली जात आहे. यातच आता काँग्रेस नेते अतूल लोंढे यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“केंद्राप्रमाणे राज्य सरकारने जर डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी केल्या तर त्याची किंमत प्रति लिटर दहा ते वीस रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठ्या वल्गना केल्या होत्या. मग आता तर तुमचंच सरकार आहे, मग तरी जास्त दर कपात करायला काय अडचण आहे”, असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तसेच भाजप पक्ष हा सत्तेत असताना वेगळा वागतो आणि विरोधात असताना वेगळा वागतो, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Jayant Patil । “१५ दिवस झाले तरी यांना सरकार स्थापन करता आले नाही”; जयंत पाटील यांचा टोला
- MNS : युवराजांना लवकरच शिल्लकसेनेसाठी यात्रा काढावी लागणार; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
- Gajanan kale MNS | छोटे नवाबांनी शिल्लक यात्रा काढावी ; गजानन काळेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत – संजय राऊत
- Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता सेन आणि ललित मोदी बांधणार ‘लग्नगाठ’; सोशल मीडियावर तुफान चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
