मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी एक मोठे वक्तव्य केले असून मुंबईचे महत्व कमी करुन सगळं काही दिल्लीला नेण्याचा डाव सुरु आहे. मात्र २०२४ साली आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावरून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘२०२४ मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच – आदित्य ठाकरे… घरातून केलेला कारभार बघता ‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो’, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
2024 मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच – आदित्य ठाकरे
घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) February 27, 2022
दरम्यान, इतर पक्ष नाटकं करतात पण आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकली नाही आणि आजही ही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध, दिला आंदोलनाचा इशारा
- “समाजवादी पार्टीवर करा तुम्ही वार, भाजपा करणार आहे तिनशे जागा पार”, रामदास आठवलेंनी दिला नारा
- “समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?”, राज्यपालांचे खळबळजनक वक्तव्य; व्हिडीओ व्हायरल
- “पुतीनचा बिघडला आहे ब्रेन…”, केंद्रीय मंत्री आठवलेंची रशिया-युक्रेन युद्धावर कविता
- IND vs SL : भारतीय संघाच्या विजयासाठी श्रेयाने मोठा गेम केला यार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

