मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा धर्मशाला येथे झालेल्या दुसऱ्या T20I सामन्यात भारताने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केल्यानंतर घरच्या मैदानावरील सर्वात यशस्वी T20I कर्णधार बनला आहे. १४८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने श्रेयस अय्यरने दमदार खेळी केली आणि ६ गडी राखत सामना जिंकला. भारताने केवळ तीन सामन्यांची मालिका ३-० अशीच जिंकली नाही तर T20I क्रिकेटमधील त्यांनी विजयाची घोडदौड सुरु ठेवली आहे. भारतासाठी हा ११ वा विजय ठरला.
दरम्यान, या विजयामुळे कर्णधार रोहितने वर्ल्ड रेकॉर्ड (rohit sharma world record) रचला आहे. कारण त्याने आता भारताला घरच्या मैदानावर १७ T20I सामन्यांमध्ये १६ विजय मिळवून दिले आहेत, अशा प्रकारे तो टी २० फॉरमॅटमध्ये घरच्या मैदानावर सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. कर्णधार रोहितने इंग्लंडचा इऑन मॉर्गन आणि न्यूझीलँडचा केन विल्यमसन यांना मागे टाकत ही कामगिरी केली. भारतीय कर्णधारांमध्ये, रोहितने (rohit sharma”) विराट कोहलीपेक्षा (virat kohli) तीन अधिक T20I आणि घरच्या मैदानावर एमएस धोनीपेक्षा (ms dhoni) पाच अधिक विजय नोंदवले आहेत. तसेच, नोव्हेंबर २०२१ मध्ये T20 फॉर्मेटचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून रोहितचा हा सलग तिसरा मालिका विजय होता. ‘हिटमॅन’ने आधीच भारताला न्यूझीलँडविरुद्ध ३-० असा विजय मिळवून दिला आहे.
एकंदरीत रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत T20I कर्णधार म्हणून २५ सामन्यांमध्ये २३ विजय मिळवले आहेत आणि त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर ३-० ने मालिका जिंकल्यानंतर T20I क्रमवारीत पहिल्या क्रमांक देखील पटकावला होता. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात न्यूझीलँडचा फलंदाज मार्टिन गप्टिल आणि भारताचा माजी कर्णधार कोहली यांना मागे टाकून ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. तसेच भारतीय संघ अफगाणिस्तानला मागे टाकत आता टी २० मधील सर्वात यशस्वी संघ बनला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध, दिला आंदोलनाचा इशारा
- IND vs SL : भारतीय संघाच्या विजयासाठी श्रेयाने मोठा गेम केला यार!
- “समाजवादी पार्टीवर करा तुम्ही वार, भाजपा करणार आहे तिनशे जागा पार”, रामदास आठवलेंनी दिला नारा
- “पुतीनचा बिघडला आहे ब्रेन…”, केंद्रीय मंत्री आठवलेंची रशिया-युक्रेन युद्धावर कविता
- “समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?”, राज्यपालांचे खळबळजनक वक्तव्य; व्हिडीओ व्हायरल

