मुंबई: दाऊद इब्राहीमशी संबंधित मुंबईतील जवळपास २० ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले असून भेंडीबाजार नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, भिवंडी, सांताक्रुझ येथील एकूण २० ठिकाणांवर छापेमारी करत एनआयएने कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. यावरूनच भाजप नेते अतूल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“NIA ची कारवाई ठाकरे सरकारचा बुडत्याचा पाय खोलात घालणार हे नक्की. अनेकांचे दाऊद कनेक्शन यातून अधिक ठसठशीतपणे लोकांच्या समोर येईल यात शंका नाही.”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
NIA ची कारवाई ठाकरे सरकारचा बुडत्याचा पाय खोलात घालणार हे नक्की. अनेकांचे दाऊद कनेक्शन यातून अधिक ठसठशीतपणे लोकांच्या समोर येईल यात शंका नाही…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 9, 2022
दरम्यान दाऊदच्या संबंधिताकडून चालवण्यात येणाऱ्या दहशवादी जाळ्याची पाळेमुळे खोलण्याचे काम एनआयएकडून सुरु असून यामध्ये संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवरही छापे टाकले जात आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वातावरणही अधिकच तापले असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- फुरसुंगी परिसरात नागरीक करतायेत तीव्र पाणीटंचाईचा सामना; सुप्रिया सुळेंनी लक्ष घालत केली ‘ही’ मागणी
- ‘तो’ सलमान खान अडचणीत, रील बनवणे पडले महागात; झाली अटक!
- राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; सत्र न्यायालयाने पाठविली नोटीस!
- IPL 2022 MI vs KKR : मुंबई बदला घेण्यासाठी सज्ज..! वाचा हेड-टू-हेड आकडेवारी का सांगते
- पुतीन ७० व्या वर्षी पुन्हा होणार बाप; गर्लफ्रेंड गरोदर!


