Share

‘तो’ सलमान खान अडचणीत, रील बनवणे पडले महागात; झाली अटक!

Published On: 

 

लखनौ : सलमान खानच नाही, तर त्याचे चाहते आणि त्याच्यासारखे दिसणारे देखील सतत चर्चेत असतात. लखनऊमध्ये सलमान खान सारखा दिसणारा व्यक्ती राहत असल्याची बातमी समोर आली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार रील बनवण्याच्या प्रकरणात सलमान खानच्या डुप्लीकेटची समस्या वाढली आहे. रस्त्यावरील शांतता भंग केल्यामुळे लखनऊ पोलिसांनी त्याला अटक केली.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण : 

भाईजानचा डुप्लीकेट घंटाघर च्या रस्त्यावर रील बनवत होता. यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणत गर्दी झाली त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होऊ लागले. यामुळे लखनऊ पोलिसांनी शहरातील घंटाघर भागातील शांतता भंग केल्याप्रकरणी भाईजानच्या डुप्लीकेटला अटक करून कलम १५१ अंतर्गत चालानही कापले आहे.

सलमान खानचा डुप्लीकेटने याआधी सुद्धा अशा प्रकाचे व्हिडीओ बनवताना अनेक वेळा दिसला आहे आणि यामुळे लोक बऱ्याचवेळा जाम मध्ये अडकले आहेत. या सतत होणाऱ्या त्रासामुळे लोकांनी डुप्लीकेट सलमान खान विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. व नंतर ठाकुरगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला अटक केली.

डुप्लीकेट सलमान खानचा सोशल मिडियावर चाहतावर्ग देखील मोठया प्रमाणात आहे. तो बऱ्याचवेळा रील्स बनवून लोकांचे लक्ष्य वेधून घेत असतो. याचे युटूबवर एक लाख ६७ हजार फॉलोअर्स आहेत, त्यामुळे त्याच्या व्हिडीओचे व्ह्यूजही लाखोंच्या घरात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!