Share

फुरसुंगी परिसरात नागरीक करतायेत तीव्र पाणीटंचाईचा सामना; सुप्रिया सुळेंनी लक्ष घालत केली ‘ही’ मागणी

Published On: 

पुणे: उरुळी देवाची आणि फुरसुंगी परिसरात नागरीकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरात पुणे महापालिकेच्या वतीने टॅंकर पुरविले जातात परंतु या परिसरातील सर्व नागरिकांना ते पुरेसे नाहीत. याशिवाय टॅंकरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे देखील योग्य नियोजन होत नाही.‌ अशी नागरीकांची तक्रार आहे. परिणामी अनेकदा सर्व नागरीकांना पाणी मिळत नाही. तसेच या परिसरातील पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनचे काम तांत्रिक अडचणींमुळे खोळंबले असून याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. अशी माहिती राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत दिली आहे.

दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेता पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमारजी आपणास नम्र विनंती आहे की, कृपया ही खोळंबलेली कामे मार्गी लावण्याबाबत सकारात्मक विचार करावा.‌यासोबतच या परिसरात टॅंकरची संख्या वाढवून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्या. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

तसेच ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून आपण यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून यावर उपाययोजना केली तर नागरीकांचा त्रास वाचेल. तरी आपण यावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, ही विनंती. असेही सुप्रिया सुळे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!