मुंबई : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.
२६ जानेवारीला झालेल्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनावर अनेक गंभीर प्रश्न उठवले गेले. या आंदोलनाआडून देशाची सुरक्षा व मोदी सरकार पडण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सरकार हे चर्चेसाठी तयार असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कायद्यांमध्ये बदल करण्याच्या भूमिकेत आहे. मात्र, शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम असून हे आंदोलन अजूनही सुरु आहे.
या शेतकरी आंदोलकांवर होणाऱ्या टिकेवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘आज साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले व त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली तरी भक्त आणि दलाल माध्यमे त्यांना खलिस्तानी, देशद्रोही आणि काँग्रेसी ठरवतील… इतका स्वतः च्या डोक्यावर परिणाम करून घेतला आहे या भक्तांनी..!!’ अशी बोचरी टीका भाई जगताप यांनी केली आहे.
भाई जगताप यांच्या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ प्रभु श्रीरामचंद्र काल्पनिक होते असे शपथपत्र तुमच्या काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे… मग ते कोणाचीही बाजू कशी घेतील? काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
"प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील"- भाई जगताप
पण प्रभु श्रीरामचंद्र काल्पनिक होते असे शपथपत्र तुमच्या काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे… मग ते कोणाचीही बाजू कशी घेतील? काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे pic.twitter.com/evxDxhiu7f
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 4, 2021
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

