औरंगाबाद : गत दीड वर्षापासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. या काळात प्रत्येकाने अनेक चढ-उतार अनुभवले. आपल्या जवळच्यांना गमावले. नोकऱ्या गमावल्या. बेरोजगारीचे चटके अनुभवले. अनेकांच एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. यांसह लॉकडाऊन, कोरोनामुळे आलेली बेरोजगारी, नैराश्य यांमुळे शहरात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र देशा’ने मानसोपचारतज्ज्ञांशी खास बातचीत केली. हे ही दिवस जाणारच आहेत त्यामुळे प्रत्येकाने स्वतःसोबत आजूबाजूच्यांची काळजी घ्या, संयम बाळगा असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
प्रत्येक आत्महत्येमागे एक स्टोरी असते. मात्र सध्या कोरोनाच्या या संपूर्ण कालावधीत आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कारण कोरोनामुळे व्यवसाय बुडाले, नोकऱ्या गेल्या, रोजगाराची बंद झालेली दारे, आर्थिक अडचणी यामुळे ताणाचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत खासकरून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंबे बाधित झाली. अनेकांनी आपल्या जवळच्यांना कायमचे गमावले. यामुळे आयुष्यात आलेले दु:ख, मनात बसलेली भिती, परिस्थिती कधी सुधारणार याबाबत आलेली अनिश्चितता हि देखील प्रमुख कारणे दिसून येतात.
त्यातच डिप्रेशन हा एक सामान्य आजार झालेला आहे. या सगळ्यांवर जो उपाय आहे तो म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात हि भावना वाढणे यासाठी मनपा सोबत मिळून आम्ही मनोमित्र कक्ष सुरु केला आहे. ७०३०९१२१०९ या क्रमांकावर संपर्क साधल्यास आम्ही नक्कीच प्रयत्न करु. अशी प्रतिक्रिया मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोनाली देशपांडे यांनी दिली.
मनोविकार व मेंदू विकार तज्ञ डॉ. विक्रांत पाटणकर यांनी सांगितले, हताश होणे म्हणजे हेल्पलेसनेस, आपल्याला कुठलेही भविष्य नाही हि भावना म्हणजे होपलेसनेस. जेव्हा हे हेल्पलेसनेस आणि होपलेसनेस या दोन्ही गोष्टींचे प्रमाण वाढते तेव्हा माणूस आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलतो. आत्ता वर्तमान परिस्थितीत काय सुरु आहे यापेक्षा उद्या भविष्य नक्कीच वेगळे असेल हा विचार करत राहावा.
आरोग्य, गमावलेली स्वतंत्रता, ढासळलेला आर्थिक पाया यांमुळे अनेक जण ताणात आहे. सध्या आमच्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्यांमध्ये कोरोनाची भिती असलेले प्रि कोविड, कोरोनानंतर आलेल्या अशक्तपणामुळे डिप्रेशनमध्ये गेलेले पोस्ट कोविड असे रुग्ण येत असतात. महाराष्ट्र देशाच्या माध्यमातून मी सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छितो, घाबरु नका, काळजी घ्या, हे हि दिवस जाणारच आहेत. परिस्थिती कधीच एकसारखी नसते. काही दिवस संयम बाळगा. प्रत्येक समस्येवर उपाय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ नियमांना व्हॉट्सऍप युजर्सनी घाबरण्याची गरज नाही; केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
- सायबर पोलिसांनी सिल्लोड पोलिसांच्या मदतीने रोखला बालविवाह
- सोलापुरातील शेतकऱ्यांसमोर सरकारने टेकले गुडघे, उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द
- ‘कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन’
- औरंगाबादेत आजवर ‘एवढ्या’ रुग्णांनी घेतले होम आयसोलेशन मध्ये उपचार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

